
अंजली जोशी
ललित ग्रंथ पुरस्कार २०१६ : विरंगी मी, विमुक्त मी
मानसशास्त्र अभ्यासक
पत्ता –
संपर्क – मो. ९८२०४३७८५१
लैंगिक विषयावर मोकळेपणाने लिहिण्याची, चर्चा करण्याची आजही महाराष्ट्रात पद्धत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी लिहिलेली अंजली जोशी यांची ‘विरंगी मी, विमुक्त मी’ ही चरित्रात्मक कादंबरी मराठी भाषेत आज महत्त्वाची ठरते. स्त्रियांची लैंगिकता आणि हस्तमैथुन या विषयावर आधारित ही कादंबरी आहे. डॉ. अंजली जोशी यांनी मानसशास्त्र आणि मनोचिकित्सा या विषयात डॉक्टरेट केलेली आहे. त्या या विषयातल्या ‘ प्राध्यापक’ तर आहेतच पण त्या समुपदेशक म्हणूनही काम करतात.‘ मी अल्बर्ट एलिस’ या कादंबरीच्या दहा आवृत्त्या आजवर निघाल्या आहेत. मराठी वाचकांनी आणि टीकाकारांनी या त्यांच्या पहिल्या कादंबरीचे मनापासून स्वागत केलेले आहे. ‘अल्बर्ट एलिस विचार दर्शन’ हा अभ्यासही (सहलेखक – कि. मो. फडके) पुस्करुपात प्रसिद्ध झालेला आहे. स्वतंत्र लेखन शैली असलेली ‘विरंगी मी, विमुक्त मी’ ही कादंबरीही विलक्षण आहे. जो विषय बोलायला आजही कुणाची तयारी नाही, सुशिक्षितांनाही संकोच वाटतो, अशा विषयावर अंजली जोशी या धारिष्ट करून कादंबरी लिहितात, हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र फाऊंडेशनने या त्यांच्या (र.धों. कर्वे यांच्या पठडीतल्या) निर्भिडपणाला सलाम ठोकलेला आहे.
साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…
पुरस्कार विजेता ग्रंथ
