
अरुण जाखडे
विशेष ग्रंथ पुरस्कार :इर्जिक पुरस्कार २०१६
लेखक, प्रकाशक
पत्ता –
संपर्क – मो. ९८५००८६४२३
भारतीय ग्रामजीवनातील सांस्कृतिक परिवर्तनाच्या प्रदेश-विशिष्ट नोंदीवर आधारलेला व्यावहारिक दस्तावेज म्हणजे ‘इर्जिक’ हे पुस्तक. यात अरुण जाखडे यांनी ग्रामजीवन आणि कृषिसंस्कृती यांच्या उद्ध्वस्तीकरणाचा आलेख आपल्यासमोर उभा केला आहे. जाखडे यांना आपण प्रकाशक म्हणून ओळखतो. पुण्यातील प्रकाशन व्यवसायामुळे त्यांचा तोंडावळा शहरी भासला तरी तरी आपल्या लेखणीतून मात्र जाखडे यांनी ग्रामजीवनाशी असलेला त्यांचा बंध नेमकेपणाने खुलवला आहे. या बंधाचेच मूर्त स्वरुप ‘इर्जिक’ हे आहे. आर्थिक संकटातील शेतक-याला त्याची अडचण समजून घेउन गावातील सगळे एकत्र येऊन मदत करतात, त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात; पण त्याला मिंधेपणाची भावना येऊ देत नाहीतसारे गावकरी याची काळजी घेतात. यालाच ‘इर्जिक’ म्हणतात. हा प्रयोग ग्रामीण भागात पुन्हा एकदा सर्वच क्षेत्रात व्हायला हवा, असे जाखडे यांना वाटते.
साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…
पुरस्कार विजेता ग्रंथ
