
अरुण खोपकर
अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार 2015 : चित्रव्यूह व चलचित्रव्यूह
दिग्दर्शक, चित्रपट अभ्यासक, लेखक
पत्ता –
संपर्क – मो. ९८२००७७७६३
जागतिक ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट अभ्यासक आणि लेखक असा अरुण खोपकर यांचा लौकिक आहे. कलावंत आणि समीक्षक -विश्लेषक या दोन्हींचा संगम असलेले ते कलावंत अभ्यासक आहेत. त्यांच्या ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलतचित्रव्यूह’ या पुस्तकांना २०१४ चा महाराष्ट्र फाउंडेशन चा ‘अपारंपारिक ग्रंथ पुरस्कार’ मिळाला आहे. साहित्य, चित्र, नृत्य, स्थापत्य, शिल्प अशा विविध कलांचे खोपकरांना वाटणारे कुतूहल, त्यांविषयीचे त्यांचे आजवरचे आकलन व चिंतन त्यांनी या पुस्तकांमधील लेखांमधून व्यक्त केले आहे. त्यांच्या लेखनातील भाषा संवादी आहे. ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलतचित्रव्यूह’ ही पुस्तकं वाचकांना खोपकरांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष पटवतात. ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका’ हे पुस्तकही प्रवाही लेखनाचा उत्तम नमुना आहे. ते बहुभाषिक आहेत. रविंद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा ते बंगालीतून रसास्वाद घेऊ शकतात. रशियन, इटालियन, जपानी भाषाही त्यांना उत्तम अवगत आहे.. अभिजात व लोकप्रिय चित्रपट संगीताविषयी ‘रसिकप्रिया’ व ‘लोकप्रिया’ सारख्या लघुपटांमधून ते संगीताविषयी काही मूलभूत संकल्पना सांगतात. ‘कथा दोन गणपतरावांची’, ‘हाथी का अंडा’ हे वेगळया शैलीतील चित्रपटही त्यांनी निर्माण केलेले आहेत, त्यांचे दिग्दर्शन केलेले आहे. ‘चार्ल्स कोरिया’ या स्थापत्य-विशारदावरील लघुपट त्यांच्या कलाविषयक प्रेमातूनच निर्माण झालेला आहे.