
अरुण टिकेकर
साहित्य जीवनगौरव पुरस्कार : 2011 (साहित्य)
पत्रकार, ग्रंथकार
पत्रकार, ग्रंथकार अशी दुहेरी ओळख असलेल्या डॉ. अरुण टिकेकर यांची वाचनाची आवड, संशोधनवृत्ती ग्रंथप्रेमी कुटुंबामुळे वृद्धिंगत होत गेली. मराठी इंग्रजी भाषेत वीसहून अधिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ‘स्थलकाल’, ‘द किंकेडस्’, ‘तारतम्य’, ‘कालमीमांसा’, ‘अस्वस्थ महाराष्ट्र’, ‘जनमन’ हे त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादनही केले. १९७५ ते २००५ या काळात पत्रकार, अभ्यासू वृत्तपत्र संपादक, संशोधक म्हणून त्यांनी बुद्धीवादी व विचारांचे लेखन केले. पत्रकारितेत गोपाळ गणेश आगरकर तर ग्रंथलेखन करताना न्या. रानडे यांना टिकेकरांनी आपला आदर्श मानले. स्थानिक इतिहास व सांस्कृतिक इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे व संशोधनाचे विषय राहिले. सामाजिक -सांस्कृतिक-राजकीय घटना, घडामोडींचे अभ्यासू विश्लेषण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होत.