समाज प्रबोधन पत्रिका
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९५
समाज प्रबोधन पत्रिका’ हे समाज प्रबोधन संस्थेचे नियतकालिक, समाजकारण, अर्थकारण, राजकारण व संस्कृती या विषयावर सातत्याने वैचारिक लेखन प्रसिद्ध करणारे मराठी भाषेतील महत्त्वाचे त्रैमासिक म्हणून समाज प्रबोधन पत्रिकेने आपले विशेष स्थान महाराष्ट्रात निर्माण केले आहे. समाज प्रबोधन संस्थेची स्थापना शंकरराव देव यांच्या पुढाकाराने १९५९ मध्ये झाली. आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीत शंकरराव देवांचे स्थान विशेष आहे.