Select Page

डॉ. अशोक बेलखोडे

समाजकार्य : कार्यकर्ता पुरस्कार 2014-सामाजिक प्रश्न

डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता
पत्ता –
संपर्क – मो.९८२२३१२२१४

डॉ. अशोक बेलखोडे हे सेवाव्रती डॉक्टर म्हणून परिचत आहेत. श्रमर्षी बाबा आमटे यांच्या प्रेरणेने आदिवासी बहुल असे किनवट गाव डॉ. बेलखोडे यांनी आपले वैद्यकीय कार्यक्षेत्र म्हणून निवडले. . ‘खेडयामध्ये चला’ हा नारा सार्थ ठरवत डॉक्टरांनी ‘हेल्थ अ‍ॅण्ड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन’ म्हणजेच ‘हॅलो’ या अभिनव चळवळीत सहभाग घेतला. मराठवाड्यातील एकमेव आदिवासी तालुका असणा-या किनवटमध्ये त्यांनी तन-मन-धनाने आदिवासी बांधवांची सेवा केली. तालुक्यातील ३९२ पेक्षा अधिक खेडयांतील दीड लाखांहून अधिक रुग्णांना डॉ. बेलखोडे यांनी सेवा दिली. प्रत्यक्ष रुग्णसेवेबरोबरच त्यांनी या परिसरात आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक व विज्ञान यांचा मेळ घालून बहुआयामी प्रयोगशाळा उभारली. आजवर सत्तर हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. केवळ ७५ रुपये मानधनावर बिनटाक्याची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ते करीत. बिनटाक्याच्या ३५ हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत, यावर विश्वास बसणे कठीण, असे हे अचाट वैद्यकीय कार्य आहे. डॉ. अशोक बेलखोडे यांनी आजही सेवासमर्पित वृत्तीने आपले कार्य चालू ठेवलेले आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014 – डॉ. अशोक बेलखोडे