
आशुतोष पोतदार
रा. शं. दातार नाट्य पुरस्कार : 2011
नाटककार, कवी
पत्ता -७०६, सी, सम्राट कॉलनी, आयसोलेशन हॉस्पिटल रोड, कोल्हापूर ४१६ ०१२
संपर्क – मो. ९३४२८३५३५८
ग्रामीण, नागरी आणि महानगरीय जीवन वास्तवाशी आलेला प्रत्यक्ष संबंध आशुतोष पोतदार यांनी ‘आनंदभाग मॉल’ या नाटकातून मांडला आहे. यात वर्तमानाला प्रतिक्रिया कशी द्यायची याचा पेच केंद्रस्थानी आहे. नाटक, एकांकिका, कविता, कथा अशा विविध प्रकारचे लेखन आशुतोष पोतदार करतात. ‘प्लॅटफॉर्म’, ‘सुख’, ‘शेतकरी डॉटकॉम’ या एकांकिका त्यांनी लिहिल्या. ‘आई दहशतवादाची’, ‘मिस जुली’ या नावाने प्रसिद्ध असलेली नााटके त्यांनी मराठीत अनुवादित केली आहेत.