Select Page

बस्तु रेगे

कार्यकर्ता पुरस्कार 2011 :  असंघटित कष्टकरी

अ‍ॅडव्होकेट, सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – संतुलन भवन, सर्व्हें नं. ५५/२, तुळजाभवानी नगर, नगर रोड, खराडी, पुणे ४११ ०१४
संपर्क – मो. ९३७१२०६७५०

असंघटित व असुरक्षित कामगारांच्या जगण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बस्तू रेगे. ‘महाराष्ट्र दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदे’ची त्यांनी स्थापना केली. कामगारांना रेशनकार्ड मिळवून देणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, कामाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व आरोग्य सेवा मिळवून देणे अशा प्रकारची कामे रेगे करतात. कामगारांना न्याय मिळवून देणे हेच आपले जीवितकार्य असल्याचे ते मानतात. ते बालमजुरीमुक्त खादान, अंधश्रद्धा निर्मुलन, आरोग्य, सुरक्षा, विमा संरक्षण, किमान वेतन, कामगार कायदे या संदर्भातील कामगरांच्याच नव्हे तर नाहीत तर सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी बस्तू रेगे कायम प्रयत्नशील असतात, त्यांवर कष्ट घेत असतात.. असंघटित कामगारांनी स्वाभीमानाने व स्वावलंबनातून वाटचाल करावी यासाठी बस्तू रेगे कायमच धडपडत असतात.कार्यरत आहेत.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2011- बस्तु रेगे