Select Page

बिंदुमाधव खिरे

कार्यकर्ता पुरस्कार 2015 :  सामाजिक प्रश्न

सामाजिक कार्यकर्ते
पत्ता –
संपर्क – मो. ९७६३६४०४८०

२०१४ चा सामाजिक प्रश्नांसंदर्भातील कार्यकर्ता पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनने बिंदुमाधव खिरे यांना दिला आहे. ‘समलिंगींना जीवनाधार’ हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. बिंदुमाधव खिरे यांनी ‘समपथिक ट्रस्ट’ च्या माध्यमातून समाजाने नाकारलेल्या वा एकटे पाडलेल्या समलिंगींना आत्मविश्वास देण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे. आजही ते ते जोमाने करत आहेत. ‘समलिंगींचा समाजाने स्वीकार करावा’ यासाठी ते समाजाचेही प्रबोधन करीत आहेत. समलिंगी असणे हा आजार नाही, हे पटवून सांगण्यासाठी खिरे सातत्याने विविध उपक्रम राबवतात. तृतीयपंथीय लोकांनाही त्यांच्या शिक्षणानुसार, कुवतीनुसार नोकरी मिळावी यासाठी त्यांची संस्था प्रयत्न करत असते. समलिंगी मुलेही समजुतदार वातावरणात वाढावीत यासाठा ते प्रयत्न करत असतात. ‘अद्वैत नाट्य व चित्रपट महोत्सव’ भरवून त्यात समलिंगींवर आणि तृतीयपंथीयांवर आधारित चित्रपटांचे, लघुपटांचे, नाटकांचे सादरीकरण केले जाते.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2015- बिंदुमाधव खिरे