चं. प्र. देशपांडे
महाराष्ट्र फाउंडेशन नाट्य पुरस्कार – २००३
जयंत पवार ह्यांनी घेतलेली मुलाखत दोलताशे हे तुमचं लोकप्रिय ठरलेलं पहिलंच नाटक असावं. ह्यापूर्वीची तुमची नाटकं स्पर्धेत वा समांतर रंगभमीवर मर्यादित प्रेक्षकांपुढे झाली. हे नाटक आविष्कारने केलं तरी ते शिवाजी मंदिरवर झालं. म्हणजे मासेस पर्यंत गेलं.
