
चंद्रकांत केळकर
समाजकार्य : विशेष पुरस्कार 2011
प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – बी १०४, राजेश पार्क, पाईपलाईन रोड, सांताक्रूझ, पूर्व, मुंबई ४०००५५
वैचारिक आणि रचनात्मक कार्यात सदैव रमणारे व्यक्तिमत्त्व अशी चंद्रकांत केळकर यांची ओळख आहे. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून त्यांची घडण झाली. ‘नाणेनिधी व जागतिक बँक यांचा नववसाहतवाद’, ‘दुसरे जग शक्य आहे – पर्याय लोकवादी व्यवस्था’ हे अभ्यासू ग्रंथ त्यांनी लिहिले. शैक्षणिक क्षेत्रातही पूर्व प्राथमिक, माध्यमिक पासून पदव्युत्तर संशोधन केंद्रापर्यंत संस्थापन-दृढीकरण यासाठी ते प्रयत्नशील राहिले. सांस्कृतिक-सामाजिक -शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या सर्जक उर्मी मुळे महाराष्ट्र फाउंडेशनने २०१० चा ‘विशेष कार्य पुरस्कार’ केळकर यांना प्रदान केला.