
चंद्रकान्त पाटील
ग्रंथ पुरस्कार 2010 । ललित
कवी, समीक्षक, अनुवादक
पत्ता –
संपर्क – मो. ९८५००१३४४४
कवी, समीक्षक व सर्जनशील अनुवादक म्हणून मराठी साहित्यविश्वाला चंद्रकान्त पाटील परिचित आहेत. त्यांनी हिंदीतील ४२ कवींच्या काव्यांचा अनुवाद केलेले पुस्तक ‘कवितान्तरण’ प्रकाशित झाले असून, मराठीतील अनेक कवींच्या कविता त्यांनी हिंदी भाषेत अनुवादित केल्या आहेत. वाचकांची अभिरूची विकसित होईल आणि कवींना कविता या साहित्यप्रकाराविषयीची अंतर्दृष्टी मिळेल अशा प्रकारचा ‘कवितान्तरण’ हा संग्रह आहे. यात भारतातील व विदेशातील १०१ कवींच्या ४०० कवितांचे अनुवाद आहेत. त्यांनी भीष्म साहनी यांच्या ‘तमस’ या कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद साहित्य अकादमीने गौरवलेला आहे.