Select Page

चंद्रकांत वानखडे

विशेष ग्रंथ पुरस्कार 2012

पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – शिवानी अपार्टमेंटस्, प्लॉट नं. ९, सेंट्रल एक्साईज ले आउट, टेलिकॉम नगर, खामला, नागपूर ४४००२५
संपर्क- मो. ९८२२५८७८४२

एका कार्यकर्त्याचे आत्मकथन म्हणता येईल असे हे पुस्तक आहे.धडाडीचा कार्यकर्ता आणि आघाडीवरील शेतकरी नेता, विचारवंत, ग्रंथकार असे चंद्रकांत वानखडे यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आयुष्यात कार्यकर्ता म्हणून जे काही पाहिले, अनुभवले, भोगले ते बहुतांश जगणे शब्दबध्द करुन ‘आपुलाचि वाद आपणासी’या पुस्तकातून वानखडे यांनी मांडला आहे. १९७० ते २००० या तीन दशकांच्या काळात ज्या ज्या व्यक्तींशी, चळवळींशी वानखडे यांचा संबंध आला, त्या त्या काळातील घटना, क्रिया-प्रतिक्रियांचे एक सांस्कृतिक संचित या पुस्तकामुळे एकत्रित झाले आहे. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, एस.एम. जोशींचा सहवास, नरहर कुरुंदकरांसारख्या विद्वान व्यक्तीचा सहवास त्यांना लाभलेला आहे. शरद जोशींचे लढे त्यांनी जवळून पाहिलेले आहेत. पवनार आश्रमातील ऋषीतुल्य विनोबा भावे यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे.संघर्ष वाहिनीत ते काही काळ होते. बाबा आढावांची कार्यपद्धती त्यांनी जवळून पाहिलेली आहे. अशा व्यक्तींच्या कामाची दैनंदिनीच वानखडे यांनी पुस्तकातून नेमक्या शब्दात मांडली आहे. चळवळींमुळे झालेली जेलवारी, शेतमजुरांचे किमान वेतन मंजुरी आंदोलन, नामांतर आंदोलन अशा सशक्त अनुभवांचा पुस्तकात समावेश आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2012- चंद्रकांत वानखडे