Select Page

चंद्रशेखर फणसळकर

रा. शं. दातार नाट्य पुरस्कार 2010 खेळीमेळी

नाटककार
पत्ता – ए१/३३, डहाणूकर रेसिडेन्सी, डहाणूकर कॉलनी, कोथरुड, पुणे ४११०३८
संपर्क – ९८२२०९०४१६

चंद्रशेखर फणसळकर हे व्यवसायाने डॉक्टर. पण नाटकाचे विलक्षण वेड व कुतूहल यातून त्यांनी ‘एकांकिका’ व ‘नाटक’ हे वाड्मयप्रकार समर्थपणे हाताळून, स्वत:चे वेगळे स्थान मराठी नाटयसृष्टीत निर्माण केले. त्यांचे ‘खेळीमेळी’ हे पुरस्कार प्राप्त नाटक मृत्यूवर भाष्य करणारे नाटक आहे. त्याचा हिंदी अनुवाद ‘राम नाम सत्य है’ नावाने झाला आहे.
फणसळकर यांची ‘रिक्षावाला’, ‘टॅक्स फ्री’ आणि ‘समद्विभुज त्रिकोण’ ही तीन नाटके विशेष गाजली असून, त्यांचे इंग्रजी व जर्मन भाषेत अनुवाद झाले आहेत. ‘आणि थोडी ओली पाने’ या नाटकातून त्यांनी विवाहबाहय संबंध हा विषय हळुवारपणे व धाडसीपणाने मांडला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या मराठी चित्रपटाचे तसेच ‘वर्तमान’ व ‘आपले घर’ या दूरदर्शनवरील मालिकांचे संवादलेखनही त्यांनी केले आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2010- चंद्रशेखर फणसळकर