Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०२०- चेतन साळवे

नर्मदा पुनर्वसनाच्या लढाईबरोबरच आदिवासी क्षेत्रातले रेशन, रोजगार, आरोग्य, शिक्षण, वन अधिकार हे प्रश्नही महत्त्वाचे होते. चेतन साळवे यांनी या प्रश्नांसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केलेला आहे. नर्मदा प्रकल्पात नेमकं किती क्षेत्र पाण्याखाली जाणार हे पाहणं, प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संपर्क साधत, त्यांनाही त्यांच्या अधिकाराबाबत जागृत करत जमिनी उपलब्ध करून देणं यात चेतन यांचं प्रत्यक्ष योगदान राहिलं आहे. नर्मदा आंदोलनाच्या नवनिर्माणाच्या कामात जीवनशाळा सुरू करणं हा एक महत्त्वाचा भाग होता. नर्मदेकाठच्या डनेल या गावातही शाळा सुरू करण्यासाठी चेतन यांनी पुढाकार घेऊन अवघ्या ८ दिवसांत १०० टक्के लोकांच्या सहभागाने व श्रमदानाने एकही रुपया खर्च न करता शाळा उभी केली. आंदोलनात संघर्षाचं काम करत असताना आपल्यातील कवी-गायकालाही त्यांनी जिवंत ठेवलं आहे.