चेतना गाला-सिन्हा
कार्यकर्ता पुरस्कार २०१७: असंघटित कष्टकरी
अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ती
संपर्क – मो. ९७६५००००१३
स्त्रियांच्या प्रश्नांशी निगडित कार्य करणा-या चेतना गाला-सिन्हा शिक्षणाने अर्थतज्ज्ञ असूनही आपलं शिक्षण, अनुभव त्यांनी ग्रामीण महिलांसाठी समर्पित केलं. प्रत्येक गरजू, पिडिती महिलेला चिरंतन सबल करण्यासाठी त्या अहोरात्र प्रयत्नशील असतात. जयप्रकाश नारायण यांच्या संघर्षवाहिनीशी त्या विद्यार्थी दशेपासूनच जोडल्या गेल्या. चळवळीतील कार्यकर्ते विजय सिन्हा त्यांच्या आयुष्याचे जोडीदार बनले. लग्नानंतर सातारा जिल्हयातील म्हसवड येथील वास्तव्यात ‘उघडयावर शौच’ या समस्येपासूनच त्यांच्या मनात गावातील परिवर्तन व विकास यांची खूणगाठ बांधली गेली. महिलांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागते हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. मग गावोगावी फिरणे, महिलांना एकत्र करुन विविध विषयांवर चर्चा-समुपदेशन करणे हेच प्रमुख कार्य बनले. घरातील शेळी पालनाचा व्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने शिकून घेतला. इतर महिलांमध्येही स्वंयंरोजगाराची संधी जागृत केली. महिलांचे बचतगट, ऊद्योग प्रशिक्षण यासाठी ‘माणदेशी ऊद्योगिनी’ ची स्थापना केली. ‘माणदेशी बँक’, ‘माणदेशी फाउंडेशन’ चे कार्य करण्यासाठी स्थानिक महिलांमधूनच नेतृत्त्वाची उभारणी केली. गुजरात, ओडिशा येथे शाखा ऊभारल्या. काही वर्षातच त्यांनी या कार्यातून तीन लाख महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला.
साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…
‘माणदेशी महिला सहकारी बँक’ स्थापना
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2017 – चेतना गाला-सिन्हा
