कॉन्टिनेंटल प्रकाशन
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९५
सर्वसाधारणपणे वीणा हाती घेऊन सरस्वती नदीकाठी खडकावर बसलेली दिसते आणि लक्ष्मी नदीतल्या कमळात उभी असते. पण हे कुलकर्णी धूर्त निघाले. त्यांनी आपली सरस्वती लक्ष्मीच्या कमळात बसवली आहे. (‘कॉन्टिनेंटल’चे बोधचिन्ह पाहा !) त्यामुळे चांगले ग्रंथ आणि तरीही भरपूर पैसा असा सुयोग जुळून आला असावा, असा सुयोग साधल्याबद्दल आम्ही अनंतरावांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीत भरभराट चिंतितो.’ कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या जुन्या बोधचिन्हाला उद्देशून जयवंत दळवी यांनी काढलेले हे मिष्किल कौतुकोद्गार. ते सार्थ वाटावेत अशीच कॉन्टिनेंटलची आजवरची वाटचाल आहे.
अंकातील मुलाखत वाचा…
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९५ -कॉन्टिनेंटल प्रकाशन