Select Page

महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं.दातार नाट्य पुरस्कार २०१९- दत्ता पाटील

दत्ता यांची ‘सेलिब्रेशन’ आणि ‘ब्लॅकआउट’ यांसारखी नाटकं ही सतत आजूबाजूच्या व्यवस्थेमधल्या फटींबद्दल विधान करताना दिसत असतात. यांचंच चित्रण मध्ये दिसलं. खेड्यात आत्मा असलेल्या त्यांच्या शहरी देहाला सतत तो विरोधाभास ठायी ठायी दिसत असतो. दत्ता एक समाजशील आणि मातीतला नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांचे विषय नातेसंबंधाच्या आधाराने आले तरी ते भवतालावर परखड भाष्य करतात.काव्यात्मकता आणि नाट्य यांचं संतुलित मिश्रण त्यांच्या नाटकांमध्ये आढळतं.‘हंडाभर चांदण्या’ मध्ये समाजावर, ‘जैसे थे’ व्यवस्थेने व्यथित न होणाऱ्या समूहावर तिरकस कटाक्ष टाकलेला आहे. महाराष्ट्र फाउंडेशनने ‘हंडाभर चांदण्या’ या संहितेसाठी द्त्ता पाटील यांना सन्मानित केले आहे.