धम्मपाल रत्नाकर
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००६
‘हॉटेल माझा देश’ या शीर्षकातून एक वेगळे जग ही कविता उभी करणार याचा अंदाज येतो, हे खरे असले तरी या जगाचे घडणारे दर्शन वेगवेगळ्या पातळ्यांवरचे आहे. धम्मपालचा अनुभव केवळ वेगळ्या जगातला आहे, असे नसून या जगाकडे डोळसपणे बघण्यातला आहे.
