
धनाजी गुरव
समाजकार्य : कार्यकर्ता पुरस्कार 2014 : असंघटित कष्टकरी
कार्यकर्ते
पत्ता –
संपर्क – मो. ९४२२६१६५३१
धरणग्रस्तांपासून ते दुष्काळग्रस्तांपर्यंत तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून ते सांस्कृतिक समस्यांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातल्या वंचितांच्या प्रश्नांचा अभ्यासक, विचारवंत व कृतिशील कार्यकर्ता अशी धनाजी गुरव यांची ख्याती आहे. क्रांतीकारी वडील व त्यांना साथ देणारी आई यांच्या सहवासात अन्यायाविरुध्द लढण्याचे धनाजी यांना बाळकडूच मिळाले. घरची बिकट परिस्थिती असूनही संघर्ष करत ते वकिल झाले. मुळातच सामाजिक कार्याची तळमळ असल्याने ते चळवळींत भाग घेऊ लागले. निपाणीच्या बिडी संघटनेत पडेल ती जबाबदारी असो वा परिवर्तनवादी विद्यार्थी संघटनेच्या झेंडयाखाली कागल, चिकोडी तालुक्यातील शेतकरी पोरांना संघटित करणे असो, धनाजी गुरव नेहमीच अग्रेसर राहिले. देवदासी परिषदा, शेती प्रश्न पाणी जागृती यात्रा, विज्ञान प्रबोधन यात्रा इतकेच नाही तर खानदेशातल्या धुळे-शहादा परिसरातील भिल्ल, पावरा या आदिवासी परिसरातील श्रमिक संघटनेने चालवलेल्या मालदार विरोधी संघर्षातही त्यांनी स्वत:ला झोकून दिले. कॉ. शरद पाटील, भाई एन.डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, मेधा पाटकर, भाई वैद्य आदी देशभरातील पुरोगामी विचारवंतांच्या गटात धनाजी गुरव यांचे नाव गौरवाने घेतले जाते.
अंकातील मुलाखत वाचा…
पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014- धनाजी गुरव