डॉ. बाबा आढाव
महाराष्ट्र फाउंडेशन जीवन गौरव पुरस्कार-२००८
बाबा आढाव यांना खऱ्या अर्थान महात्मा फुल्यांचे वारसदार म्हणता येईल. १९ व्या शतकातील वासाहतिक संदर्भात सार्वजनिकतेचे भान न सोडता, उपेक्षितांची बाजू घेत ठोस राजकीय संघर्ष आणि प्रबोधनाची सांगड घालून महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात मुक्तिदायी राजकारणाचा एक आगळा प्रयोग राबवला
