डॉ. रामचंद्र चिंतामणी ढेरे
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २०००
महाराष्ट्रातील मराठी साहित्य, लोकसंस्कृती, दैवते यांचे थोर अभ्यासक आणि अग्रगण्य संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आता आपल्या संशोधन कार्याची पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत. आजही त्यांचे संशोधनकार्य अव्याहतपणे चालू आहे. अनेक ग्रंथांच्या लेखनाचे संकल्प त्यांच्या डोक्यात आहेत.
