डॉ. रावसाहेब कसबे
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार– २००८
आंबेडकरोत्तर काळात दलित चळवळीने घडविलेले एक मोठे विचारवंत म्हणजे डॉ. रावसाहेब कसबे. गेली साडेतीन तपे ते दलित चळवळीचेच नव्हे, तर एकूणच परिवर्तनवादी चळवळीचे दिशादर्शक राहिले आहेत. बाबासाहेबांचे विचार हे समतावादी असून समताधिष्ठित सामाजिक पुनर्रचना हाच त्यांच्या विचाराचा खरा केंद्रबिंदू आहे, असे त्यांनी आग्रहीपणे प्रतिपादिले.
