Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (अ-पारंपरिक/ वैचारिक) साहित्यकृती : ‘टिपंवणी’ सन्मान २०२१- डॉ. सिसिलिया कार्व्होलो, वसई

सिसिलिया कार्व्हालो यांच्या ‘टिपंवणी’ या आत्मकथनाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. त्या विश्वविद्यापीठात प्राध्यापक असून चर्चमध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. तसेच एकट्या आणि अत्याचारग्रस्त स्त्रियांना मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या लेखनात ठिकठिकाणी श्लेष आणि यमकांची पेरणी जाणवते आणि एका वेगळ्याच भाषिक सौंदर्याचा प्रत्यय येतो. स्वतःकडे आणि इतरांकडे शक्यतो वस्तुनिष्ठ बुद्धीने पाहून सारासार विचार मांडण्याची प्रामाणिक शैली त्यांच्या आत्मकथनात दिसून येते. बुद्धिवादाच्या आणि स्त्रीवादाच्या भूमिकेतून त्या आपल्याला आपले स्वतंत्र विचार मांडताना आणि पटलेल्या भूमिकेचे वैचारिक समर्थन करताना दिसतात. वाडवळ ख्रिस्ती बोली, प्रमाण मराठी भाषा, इंग्रजी, हिंदी, लॅटिन आणि संस्कृत एवढ्या भाषांचा त्यांचा व्यासंग सहज दिसून येतो. हे लेखन अनेक अंगांनी मराठीला समृद्ध करेल यात शंका नाही.