पुरस्काराचे नाव – समाजकार्य कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप – पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
पुरस्कार सन्मानित व्यक्तीचे नाव – दत्ता देसाई
दत्ता देसाई यांचा गेली ४५ वर्षे जनविज्ञान चळवळ व प्रबोधनकार्यात सहभाग. बँक अधिकारी पदाचा राजीनामा देऊन १९८३ पासून पूर्णवेळ सामाजिक कार्य. व्याख्याने, चर्चासत्रे, शिबिरे, कार्यशाळा, कलाजत्थ्ये आणि विज्ञान मोहिमांमध्ये राज्यभर तसेच राष्ट्रीय पातळीवर सक्रिय. समाज विज्ञान अकादमी-पुणे व भारत ज्ञान विज्ञान समुदाय-महाराष्ट्र यांच्या तसेच विविध मंचाच्या माध्यमातून कार्यरत. आरोग्य, शिक्षण, दुष्काळ-पाणी व सिंचन, जागतिकीकरण या संदर्भातील चळवळींमध्ये सहभाग. महाराष्ट्रातील विकासाची जनविरोधी दिशा, महाराष्ट्रातील दुष्काळ आणि त्याला पर्याय म्हणून पुनर्जीवी, समतोल, न्याय्य विकासाचा मार्ग यावर ते भर देत राहिले आहेत.
प्रकाशित पुस्तके : ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’; ‘जलयुद्ध की जलक्रांती?’; ‘महाराष्ट्रातील विकासाची दिशा’; ‘आधुनिकतेचे आगमन’; “नव‘उदार’ जगाचा उदयास्त”; ‘सत्ताबदल’ ही पुस्तके, २० हून अधिक पुस्तिका तसेच अनेक वैचारिक लेख
संपादन : ‘शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय’; ‘बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे…’ [दोन खंड] या १२०० पानी महाग्रंथाचे संपादन दत्ता देसाई यांनी संपादन केले आहे. समाजविज्ञान अकादमी इ. पुणे यांनी निरनिराळ्या शहरांमध्ये २०२४ मध्ये या पुस्तकावर चर्चा आयोजित केल्या. त्यात त्यानी मार्गदर्शन केले आहे.
यूट्यूब संवादमालिका : ‘जग बदल, जाणुनी मार्क्स…’ या ४४ भागातील व्हिडियो संवाद मालिकेत दत्ता देसाई यांनी मार्क्सचे म्हणणे मराठी-श्रोत्यांसाठी उलगडून दाखवत या तुलनेने नव्या माध्यमाचाही मार्क्सवादी प्रबोधनासाठी वापर करत मोठी कामगिरी केली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यावरही ही मालिका उपलब्ध आहे. युट्युब चॅनलच्या माध्यमातून मार्क्सवादा बद्दल दर्जेदार प्रबोधन करणारी ही एकमेव मालिका आहे