
जी. जी. परीख
समाजकार्य : जीवनगौरव पुरस्कार 2012
सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर
पत्ता – गणेश प्रसाद, नौशिर भरुचा मार्ग, मुंबई ४००००७
संपर्क – मो. ९८९००९८५०
गुणवंतराव गणपतलाल परीख म्हणजे रचनात्मक संघर्षाचा तळपता आदर्श नेता. समाजवादी पक्षात सक्रीय राहूनही परीख यांनी कधीच निवडणूक लढविली नाही. प्रबोधन, रचना, संघर्ष या तीनही क्षेत्रात त्यांनी सक्रीय कार्य केले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस चळवळीत नेहमीच परीख अग्रेसर असत. ‘क्विट इंडिया’, ‘सायमन गो बॅक’ या घोषणांचे जनक युसूफ मेहेरअली यांच्या नावाने रायगड जिल्हयातील आदिवासी भागात ‘तारा’ येथे त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. या केंद्राद्वारे आरोग्य, शेती, शिक्षण, खादी ग्रामोद्योग, स्वयंसहायता गट या प्रकारची कामे करुन त्यांनी पर्यायी विकासाचे एक वेगळे मॉडेल समोर आणले. सात दशकांहून अधिक काळ समाजव्रती म्हणून जी. जी. परीख कार्यरत आहेत.