
जी. के. ऐनापुरे
ललित ग्रंथ पुरस्कार 2011
कथाकार, चित्रकार
पत्ता – ३०, कृष्णा, रघुवंशी सोसायटी, विजयनगर पूर्व, वानलेसवाडी, सांगली ४१६ ४१४
संपर्क – ९४२३०१७८३६
जी. के. ऐनापुरे यांच्या ‘रिबोट’ या कादंबरीतून मुंबईतील गिरणगावातल्या जीवनाचे, त्याच्या पतझडीच्या आरंभ काळातील परिस्थितींचे दर्शन होते. अत्यंत विदारक असे हे जगण्याचे स्वरुप ऐनापुरे यांनी प्रभावीपणाने मांडलेले आहे. अस्तित्ववाद आणि वास्तववाद याचा आशय असलेली ‘अवकाश’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ‘जाईच्या घरी जाई’, ‘अभिसरण’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.