Select Page

गजानन खातू

समाजकार्य : कार्यकर्ता पुरस्कार : प्रबोधन 2014

सामाजिक कार्यकर्ता,
पत्ता – मुंबई

हजारो कार्यक्रमांसाठी, आंदोलनांसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडूनही सतत पडद्याआड राहून सर्वांच्या बरोबरच असणारे गजानन खातू हे आगळे वेगळे समाजधर्मी आहेत. ते समाजवादी परिवारातले. सहकारक्षेत्र आणि पुरोगामी चळवळीतील हाडाचे कार्यकर्ते. सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडीत कोणत्याही मुद्द्यावर खातू सदैव अग्रेसर असतात. सहकार, ग्राहक चळवळ यां विषयातले ते नावाजलेले तज्ज्ञ आहेत. ‘ मुंबई कामगार संस्थे’ च्या तर्फे सुरु झालेल्या ‘अपना बजार’ या डिपार्टमेंटल स्टोअरच्या उभारणीत त्यांनी महाव्यवस्थापक या नात्याने मौलिक कामगिरी केली. वडघर-माणगाव या रायगड जिल्हयातील ‘ साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ ची संकल्पना, मांडणी त्यांचीच आहे. विषमता निर्मूलन परिषद, सामाजिक कृतज्ञता निधी, गिरणी कामगार आंदोलन अशा अनेक चळवळींमध्ये, उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता, आजही आहे. आणीबाणीपूर्व जयप्रकाश नारायण यांचे नवनिर्माण आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, नर्मदा बचाव आंदोलन यांतही त्यांनी भाग घेतला. वैचारिक बांधिलकी जपणारे गजानन खातू कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते म्हणून राहणे पसंत करतात.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014- गजानन खातू