
हरीश सदानी
कार्यकर्ता पुरस्कार 2011 : सामाजिक प्रश्न
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – ७०५, परिश्रम बिल्डिंग, ७ वा मजला, भंडार गल्ली , लेडी जमशेजी रोज, माहीम, मुंबई ४०००१६
संपर्क – ९८७०३०७७४८
स्त्री सक्षमीकरण व स्त्रीपुरुष समतेसाठी ‘मेन अगेन्स्ट व्हायोलेन्स अँड अॅब्यूज’ अर्थात ‘मावा’ ही संस्था हरीश सदानी यांनी स्थापन केली. समानतेसाठी पुरुषांच्या सहभागाविषयी महत्त्वाच्या पण दुर्लक्षित असलेल्या मुद्यावर अत्ंयत प्रभावीपणे काम केले. भित्तीपत्रके, गटचर्चा, संवाद, खेळ, पथनाट्य अशा माध्यमांच्या वापरातून महाराष्ट्रातील चार जिल्हयांमध्ये युवकांमध्ये ‘जेंडर’ हा विषय अभिनव पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘जेंडर आणि सेक्शुअॅलिटी’ (लिंगभाव आणि लैंगिकता) यां संदर्भातील त्यांचे लेखन महत्त्वाचे आहे.. ‘हेल्थ अॅड पॉप्युलेशन इनोव्हेशन फेलोशीप’ त्यांना मिळाली. संक्रमणकाळात जिद्दीने काम करणा-या पिढीचे प्रतिनिधित्व हरीश सदानी निष्ठेने करतात.