Select Page

हिमांशू स्मार्त

रा. शं. दातार नाट्य-पुरस्कार 2015 : जत्रेतलं जायंट व्हील

हिमांशू स्मार्त – नाटककार
पत्ता –
संपर्क – मो. ९८९०१९४०२७

‘जत्रेतलं जायंट व्हील’ या नाटकात हुरहूर आणि उत्कंठेचा ताण हिमांशु स्मार्त यांनी कमालीच्या ताकतीने उभा केला आहे. मॉलमधील आकर्षक वस्तू प्रलोभने, सगळया वस्तुसृष्टीला अधिकृत ठरवणारी धडपड हिमांशू स्मार्त यांनी नेमकेपणाने मांडली आहे. जायंटव्हीलचा थरार व गंमत, प्रत्यक्ष पाळण्यात बसण्याआधीचा दबाव व नंतर क्रमाक्रमानं उंचीवर नेत एकदम ढकलून देणारे जायंटव्हील, हा नाट्यानुभव या नाटकातून प्रेक्षकांना मिळतो. समकालाचे अत्यंत सूक्ष्म भान आणि त्यातील अंतर्विरोधांसह एक तिरकस अनवट शैलीतील लेखनामुळे नाटककार हिमांशू स्मार्त हे नव्या पिढीतील महत्त्वाचे नाव आहे. कालावकाशाचे समग्र भान जपणारे लेखक ही त्यांची महत्त्वाची ओळख. काव्यलेखनापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास नाटयलेखनापर्यंत पोहोचला. ‘ट्रिपल सीट’, ‘बॅकअप’, ‘वाटले होते काही मैल’, ‘मौन’, ‘जत्रेतलं जायंटव्हील’ या नाटकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. खेरीज नाट्यविश्लेषण, नाट्यसमीक्षा, नाट्यप्रयोग व सौंदर्यशास्त्रावरील अध्यापन यांतही त्यांना उत्तम गती आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2015 – हिमांशू स्मार्त