Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार २०१९- जमीलाबेगम पठाण

आंध्रप्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या जमीलाबेगम अठराव्या वर्षी लग्न होऊन मुंबईला आल्या.
मेधाताईंच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेया ‘घर बचाओ घर बनाओ’ या आंदोलनात त्या सामील झाल्या. सोबतच पुरुषप्रधानता आणि घरगुती हिंसा यावर वस्तीतील त्यांनी महिलांमध्ये जागृती करण्याचे कार्य केले आहे. २००७ मध्ये आफ्रिका इथे भरलेल्या ‘वर्ल्ड सोशल फोरम’मध्ये त्यांनी फक्त मुंबईच नव्हे, तर ‘भारतातील गरीब लोकांच्या वस्त्या’ या विषयावर प्रभावी भाषण केलं होतं. ‘घर हमारा हक है – लेके रहेंगे’ अशी घोषणा त्यांनी भाषणादरम्यान केली होती.त्यांना या वर्षीचा महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार’ मिळाला आहे.