पुरस्काराचे नाव – समाजकार्य कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप – पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
पुरस्कार सन्मानित व्यक्तीचे नाव – प्रा. जावेद पाशा
प्रा. जावेद पाशा हे उत्कृष्ट लेखक, पथनाट्यद्वारे समाज जागृती करणारे कलावंत, नाट्यदिग्दर्शक, प्रबोधनकार अशा विविध भूमिकेतून सतत तीस वर्षे कार्यरत. महाराष्ट्रात आज पर्यंत 3000 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेले आहेत संत साहित्य इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रघाड अभ्यासक तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आहेत.
1990 मध्ये त्यांनी मुस्लिमांच्या भावनिक, धार्मिक प्रश्नाऐवजी शिक्षण, रोजगार यावर “भारतीय मुस्लिम परिषद” ही वैचारिक आणि प्रबोधनवादी संघटना बनवून मुस्लिमांच्या तळागाळातील लोकांना
सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक चळवळीत आणण्यासाठी सुरवात केली. मुस्लिम तळागाळातील जाती, जमातीसाठी मुस्लिम ओबीसी चळवळ चालविली आणि त्यांना 1995 मध्ये आरक्षण मिळवून दिले.
1991 मध्ये तळागाळातील मुस्लिमांच्या व्यथा, वेदना व वास्तवासह इतर समाजाशी संवाद साधण्यासाठी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ प्रा. फकरुद्दीन बेंनुर, सोलापूर यांच्या पुढाकाराने सुरू केली.
हिंदू – मुस्लिम संवाद घडावा आणि गैरसमज दूर व्हावे म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा “समतेसाठी संत – सुफी साहित्य संमेलन” 2010 मध्ये वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित केले.
मागासवर्गीय समाजात धर्मद्वेष कमी करण्यासाठी आणि सहकार्याच्या भूमिकेतून वातावरण निर्मितीसाठी सतत पाच वर्षे आतंकवाद विरोधी आंदोलन चालविले. समाजात साहित्यिक व प्रबोधनात्मक साहित्याची निर्मिती करून मुस्लिम मराठी साहित्य परिषद 1990 मध्ये स्थापित केली आणि आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावरचे 10 संमेलन यशस्वीपणे पार पाडले. महाराष्ट्रात उत्कृष्ट अभ्यासू, समतोल आणि प्रखर वक्ता म्हणून मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे व्याख्याने आयोजित करतात.