Select Page

जयंत पवार

साहित्य : रा. शं. दातार नाट्य पुरस्कार 2013

नाटककार, पत्रकार
पत्ता – सी ८११, भूमिग्रीन, रयेजा इस्टेट, कुलूपवाडी, बोरिवली पूर्व, मुंबई ४०० ०१६
संपर्क – मो. ९७६९९८८९८४

जयंत पवार हे वेगळी अशी स्वतःची वाट निर्माण करणारे नाटककार आहेत.‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक पवार जवळपास आठ वर्ष लिहित होते. वारंवार पुन्हा लिहित होते. मनाचे समाधान झाल्यावरच त्यांनी ते पूर्णत्त्वाला नेले. हे नाटक म्हणजे, माणसाच्या घुसखोरीचाच इतिहास आहे. चाळी विकत घेउन त्याजागी टॉवर बांधून मालामाल होउ पाहणारे बिल्डर, मोठया फॅ्लटचे, भरपूर पैशाचे आमिष, त्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली रक्ताची माणसं, हवी ती जागा रक्तपात घडवून ताब्यात घेणारे राजकारणी, त्यांचे गुंड यांचे प्रत्ययकारी वर्णन आले आहे. पण यातच घाम गाळून जगणा-या सामान्य माणसांच्या सर्वस्वाची झालेली होळी याची साक्ष म्हणजे हे नाटक. आपल्या समाजाचं विदारक दर्शन घडविणारी ‘काय डेंजर वारा सुटलाय’ ही प्रतिभावान नाट्यकृती आहे. या सोबतच नाटककार जयंत पवार यांचे ‘अधांतर’ हे नाटक मराठी रंगभूमीवर गाजलेले आहे. ‘दरवेशी आणि इतर एकांकिका’हा त्यांचा एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा त्यांचा कथासंग्रह जाणत्या वाचकांचं लक्ष वेधून घेणारा ठरलेला आहे. उत्तम कथाकार आणि नाट्यपरिचय, समीक्षा, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे म्हणूनही ते महाराष्ट्राला परिचित आहेत.‘महाराष्ट्रटाइम्स’ चे ते जागरूक पत्रकार आहेत. पण त्यांची खरी ओळख ‘ संवेदनशील कथाकार आणि नाटककार’ अशीच आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2013- जयंत पवार