जयप्रकाश वासुदेव सावंत
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००१
“तुला एका चांगल्या मित्राची ओळख करून देतो”त्यातल्या ‘चांगल्या’ शब्दावर अधिक जोर देत पाशा पिपळापुरेने जेव्हा जयप्रकाश सावंतची ओळख करून दिली तेव्हा त्या अल्पावधीतही त्याच्या मित्रत्वाच्या चांगुलछटा अनुभवायला मिळाल्या. हीच सूक्ष्म ओळख पुढे स्थिर होत गेली आणि जयप्रकाश बैठकीतला चांगला मित्र झाला.
