Select Page

ज्योति म्हापसेकर

विशेष कार्य पुरस्कार 2012

सामाजिक कार्यकर्त्या, ग्रंथपाल
पत्ता – बिल्डिंग नं. ११६, फ्लॅट नं. ३९७८, टिळकनगर, गीतगोविंद सोसायटी, चेंबूर, मुंबई ४०० ०८९
संपर्क- मो. ९८६७७२४५२९

ज्योति म्हापसेकर यांच्या कुटुंबातील सर्वानाच साने गुरुजींचे सानिध्य लाभले. लग्नानंतर म्हापसेकर यांनी संसार सांभाळून ग्रंथपाल म्हणून नोकरी केली. पण सामाजिक कार्याचे बीज मनात होते. त्यातून १९७५ मध्ये आंतरराष्टीय महिला वर्षात त्यांनी ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या माध्यमातून कार्य सुरु केले. सामाजिक कार्यातील विविध प्रश्नांकडे पाहताना त्यांना नाटक माध्यमातून समस्या मांडण्याचा विचार भावला. यातून ‘मुलगी झाली हो’, ‘हुंडा नको ग बाई’, ‘बाप रे बाप’ या प्रबोधनपर नाटकांचे लेखन करुन त्यांचे प्रयोग विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागात केले. अत्यंत सोप्या शब्दात व संवादात स्त्री पुरुषांना ‘स्त्री-वाद’ समजावून देण्या-या या नाटकांनी प्रभावी भूमिका बजाविली. समाजप्रबोधनासाठी नाटकांचा केलेला हा वापर त्यांना अनेक सामाजिक कार्य करणा-या कार्यकर्त्यांशी संपर्क साधायला उपयुक्त ठरला. ‘परिसर विकास’ च्या माध्यमातून कचरा वेचणा-यांच्या समस्यांना ज्योती म्हापसेकरांनी वाचा फोडण्याचे कार्य केले.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2012- ज्योति म्हापसेकर