Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृति-पुरस्कार २०२०- के. वीरमणी

के. वीरमणी यांनी आपल्या जीवनकार्याची सुरुवात ‘द्रविड कळघम’ची (‘डीके’ची) स्थापना करून केली. ’आसरियार’ डॉ. के. वीरमणी यांनी पेरियार यांचा विवेकवादाचा व आत्मसन्मानाचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. आसरियार सध्या ‘पेरियार सेल्फ रिस्पेक्ट प्रपोगंडा इन्स्टिट्यूशन (PSRPI)’ या सार्वजनिक ट्रस्टचे सचिव आहेत. पेरियार यांनी सुरू केलेली ही सामाजिक चळवळ आता आसरियार यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते. आसरियार के. वीरमणी यांनी आजवर अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत. द्रविड कळघमसोबतच आसरियार डॉ. के. वीरमणी यांच्याकडे ‘द रॅशनलिस्ट फोरम’ या संस्थेचं नेतृत्व आहे. आसरियार यांनी जागतिक पातळीवर पोचण्यासाठी आता ‘ग्लोबलायझेशन ऑफ पेरियार मिशन’ हे महत्त्वाचं कार्य हाती घेतलेलं आहे.