
कल्पना दुधाळ
ललित ग्रंथ पुरस्कार २०१७ : धग असतेच आसपास ।
शेतकरी, कवयित्री
संपर्क – मो : ९९२३६ २७२१८
कल्पना दुधाळ यांचा ‘धग असतेच आसपास’ हा कवितासंग्रह एका कष्टकरी स्त्रीच्या अनुभवातून समृद्ध लेखणीत ऊतरलेले वास्तव आहे. आशयदृष्या आपलं निराळेपण जपणा-या, वास्तवाचे भान देणा-या कल्पना दुधाळ यांच्या या कविता आहेत. प्रत्यक्ष शेतात शेती करताना आलेल्या ऊत्कट अनुभवांच्या बळावर त्यांची कविता ऊभी आहे. सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्याच्या टेंभुर्णी गावात त्या वास्तव्य करतात. शेतातच घर. गरज पडेल तेंव्हा शेतीकाम, घरात शिक्षणाचा अभाव अशा अनंत अडचणी असतानाही त्यांनी जिद्दीने शालेय शिक्षण पूर्ण केले. ऊच्च शिक्षणासाठी पुण्यात रहात असताना घरच्या ओढीतून त्यांनी पहिली कविता लिहिली. पण कवितेचा खरा नाद त्यांना लग्नानंतर गावात शेती करताना लागला. शेती विषयक विविध कामातून भोवतालची माणसं, निसर्ग, गुरं-ढोरं, पशु-पक्षी, शेतीमाल या घटकांचा प्रभाव त्यांच्या कवितेत येऊ लागला. नैसर्गिक शेतीला आलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे पर्याय पाहून त्या अस्वस्थ झाल्या. यातूनच त्यांना ‘सिझर कर म्हणतेय माती’ ही कविता स्फुरली. या अनुभवविश्वातून शेतात काम करणा-या महिला, जनावरं, निसर्ग, पर्यावरण याच्या संबंधी कविता त्यांना स्फुरु लागल्या. स्वत:विषयी किंवा शेतीविषयी लिहिण्यातून आजच्या काळातील समाजमन, नातेसंबंध यांच दाहक चित्रण त्यांनी कवितेतून मांडलं. साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…
पुरस्कार विजेता ग्रंथ
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१७- कल्पना दुधाळ
