
करूणा गोखले
साहित्य : वैचारिक ग्रंथ पुरस्कार 2015
भाषाशास्त्र, लेखन
पत्ता – सप्तसूर, एच ४०३, डी. एस. के विश्व, धायरी, पुणे ४११ ०४१
मो. ९३२२७७००७३
करुणा गोखले यांच्या ‘बाईमाणूस’ पुस्तकात त्यांनी वर्तमानातील विवाहसंस्था, कुटुंबसंस्थेतील स्त्रीचे स्थान, स्त्रीशिक्षण, स्त्री विषयक कायदे, स्त्री देहाविषयी धर्माचा व प्रसारमाध्यमांचा दृष्टिकोन या विषयांची चर्चा केलेली आहे. स्त्रीवाद ही स्वयंभू, स्वतंत्र विचारधारा नसून ती लोकशाहीचीच एक शाखा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’ पुस्तक करते.
करुणा गोखले या या मायक्रोबायॉलॉजीमध्ये बी. एस्सी., रशियन भाषेत एम. ए., एम.फिल व भाषाशास्त्रात त्यांनी पीएच. डी. केली आहे. ‘प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रातील एक महत्त्वाचे पुस्तक मराठी आणावे.’ ही कवी विंदा करंदीकर यांनी दिलेल्या प्रेरणेतून करुणा गोखले यांनी पहिला अनुवाद केला. नंतर ‘सिमॉन द बोवा’ यांचे ‘सेकंड सेक्स’, बट्रॉड रसेल यांचे ‘द कॉन्वेकेस्ट ऑॅफ हॅपिनेस’ आदी पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले.