Select Page

किरण गुरव

ललित ग्रंथ पुरस्कार 2015 : राखीव सावल्यांचा खेळ (कथासंग्रह)

लेखक
पत्ता –
संपर्क – मो. ९४२०४५६४४०

‘राखीव सावल्यांचा खेळ’ या संग्रहाचे कथाकार किरण गुरव हे समकालीन कथासाखळीतील महत्त्वाचे लेखक आहेत. हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह. भौतिक बदलांमुळे ग्रामरचनेतील सत्तासंबंधापासून ते मानवी मानसिक रचनेपर्यंतचे बदल कसे घडत गेले हे त्यांनी संवेदनक्षम मनाने टिपलेले आहे. कथांमधील वर्णनात्मक शैली, निवेदन, संवाद, बोलीभाषा व तिचा प्रादेशिक बाज यांचा त्यांनी कल्पकतेने वापर केलेला आहे. लोकपरंपरेने चालत आलेली संस्कृतिक रुपतत्त्वे त्यांच्या लेखनात आढळतात. ‘गवर’, ‘नभ उतरु आलं’, ‘राखीव सावल्यांचा खेळ’ यांसारख्या कथा कष्टकरी स्त्रियांच्या आत्मभानाबद्दल काही बोलू पाहतात. कथेच्या प्रभावी अशा जाणीवविश्वाबरोबरच कलात्मक रुपाला स्वायत्त स्थान देणारी कथारुपे किरण गुरव यांच्या लिखाणातून प्रकटतात. वाचकांना समृद्ध करतात.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2015 – किरण गुरव