कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार २०२२
कुमारीबाई जमकातन, गडचिरोली
पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे
छत्तीसगडमधील राजनादगाव जिल्ह्य़ातील जंतर गावातला डोईवरचा पदर थेट हनुवटीपर्यंत असण्याची सवय असणाऱ्या कँवर आदिवासी समाजातील कुमारीबाईंचा जन्म. अशा समाजातील कुमारीबाई पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध बंड करून उठते. २००५ ला कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रात घरमालक पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात यावे, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. वंचित महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या बोली भाषेत हक्कांविषयी माहिती देणे व एसएचजी ग्रुपशी जोडणे. स्त्रियांना मतदानाचा हक्क आहे तर ग्रामसभेत येण्याचासुद्धा असे सांगून स्त्रीयांना ग्रामसभेत प्रवेश मिळवून दिला. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या दहा टक्के निधी महिला व बालकल्याणासाठी मिळवून दिला.




