
लक्ष्मीकांत देशमुख
लक्षवेधी प्रशासकीय कार्य पुरस्कार २०१०
प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) – साहित्यिक
पत्ता – बी-२, श्रीनिवास गार्डन, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५
संपर्क – ९३२५२९७५०९
प्रशासन पारदर्शक असावे, लोकाभिमुख कामांना गतिमानता मिळावी, अशी आग्रही भूमिका लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट म्हणता येईल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी पद स्वीकारल्यानंतर देशमुख यांनी ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या समस्येवर विशेष लक्ष दिले. यासंदर्भात प्रशासन गतिमान करण्याबरोबरच स्त्री भ्रूण हत्येला जबाबदार असणा-या संबंधित घटकांना जरब असेल अशी कारवाई सुरू केली. त्यांनी राबविलेल्या ‘सेव्ह द बेबी गर्ल, सेव्ह द नेशन’ अभियानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्रियांचा जन्मदर अवघ्या एका वर्षात ८३९ वरुन ९०१ पर्यत गेला. अशा प्रकारे अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी आपल्या पध्दतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ने त्यांना या वर्षीचा ‘ लक्षवेधी प्रशासकीय कार्य’ पुरस्कार देऊन घेतलेली आहे.