Select Page

लक्ष्मीनारायण बोल्ली

ग्रंथ पुरस्कार 2010 । अपारंपरिक 

साहित्यिक, अनुवादक

‘आंतरभारती’ चे उपासक असलेले लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी ‘तेलुगु’ भाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणले आहे. त्यांनी स्वतंत्र कविता व ललित लेखन केले असून तेलुगुतील कविता, कथा, कादंबरी व नाटक या चारही प्रकारचे सर्जनशील लेखन मराठीत आणले आहे. ‘एका साळियाने’ हे लक्ष्मीकांत बोल्ली यांचे आत्मकथन आहे. तेलुगु भाषिक व्यक्तीचे मराठीतील पहिलेच आत्मकथन आहे. यात दोन भाषांचे, भाषिकांचे व संस्कृतींचे दर्शन घडते. याबरोबरच लक्ष्मीकांत बोल्ली यांनी तेलुगु-मराठीचा तौलनिक अभ्यास करताना लिपी, भाषा, साहित्य, संस्कृती, खेळ, नाटय, शिल्प, अलंकार, व्रतवैकल्ये, लोकगीते, लोककथा आणि संतसाहित्य यांचा सुमारे एक हजार वर्षांचा धांडोळा त्यांनी घेतला आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2010- लक्ष्मीनारायण बोल्ली