
लीला आवटे
साहित्य : अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार 2013 – जाग मना जाग
शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या
पत्ता – बिल्डिंग नं. २४, प्लॉट नं. ६४४, नेहरुनगर, कुर्ला पूर्व, मुंबई ४०००२४
संपर्क – मो. ९८२१८३६४००
समाजकारण, राजकारण करणारी एखादी व्यक्ती आपल्या ऐंशी वर्षांच्या कालखंडात त्यातील माणसं, शहर, परिसर व देश-विदेशातील स्थित्यंतरे, समाजातील विविध प्रश्न यावर आपल्या पध्दतीने उत्तर शोधत समाजमनाचा धांडोळा अभ्यासूवृत्तीने घेते, त्याविषयी लिहिते, तेव्हा त्या लेखनाला वास्तव अनुभवांचे वजन प्राप्त होते. लीलाताई आवटे यांच्या ‘जाग मना जाग’ या पुस्तकातून त्याची प्रचिती येते.
शिक्षिकेची नोकरी करत असतानाच लीलातार्इंनी पुरोगामी विचाराच्या स्त्री संघटनांबरोबर कार्य केले. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय एकात्मता ही संविधानीक मूल्ये आचरणात आणत असतानाच ती त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनाही शिकविली. महिला फेडरेशनच्या ‘महिला आंदोलन पत्रिके’ त त्यांनी विपुल लेखन केले. त्यातीलच निवडक लेख ‘जाग मना जाग’ पुस्तकात आहेत. महिला आरक्षण, गर्भजल लिंगनिदान, मुलांचे शोषण असे अनेक विषय पुस्तकात समाविष्ट आहेत. प्रस्थापितांविरोधी आवाज उठवणा-या लीलातार्इंच्या लेखणीतून ‘मी एकटा एकटा’, रशियन समाजवादी क्रांतीचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम’, ‘महात्मा गांधींचा खून कोणी केला व का?’, ‘चौफुला’ हा कथासंग्रह, ‘माय फ्युदल लॉड’, ‘इंडिया : टुडे अॅाण्ड टुमारो’, ‘पेरेस्त्रोईका’ आदि पुस्तके अनुवादित केली.