लीलाधर हेगडे
महाराष्ट्र फाउंडेशन विशेष गौरव पुरस्कार- २००५
लीलाधर हेगडेना महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष गौरव पुरस्कार’ मिळाला हे ऐकले आणि इतका आनंद झाला की मला वाटले मलाच परस्कार मिळाला. लगेच वाटले, नाना (मधु दंडवते) असते तर त्यांनाही तितकाच आनंद झाला असता. हा पुरस्कार साने गुरुजी परिवारातल्या सर्वांना फार आनंदाचा आहे ६० वर्षांच्या अखंड शाहिरीचा गौरव आहे आणि शाहिरी म्हणजे कशी ? नुसती करमणूक नव्हे, तर सतत प्रबोधन!
