
माधव बावगे
कार्यकर्ता पुरस्कार 2013 : प्रबोधन
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – अभियान, प्रकाशनगर, बार्शी रोड, लातूर
मो. ९४२२४६९५६४
माधव बावगे हे लातूरमधील पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळींशी निगडित महत्त्वाचे कार्यकर्ते. लातूरला त्यांनी‘कमवा आणि शिका’ योजनेतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. राजर्षी शाहू महाविद्यालयातच लिपीक म्हणून ते रुजू झाले. शिकण्याची आणि कष्टाची तयारी व चांगले वर्तन यामुळे ते‘प्रबंधक’ पदापर्यंत पोहोचले. पण त्यांचा खरा ओढा सामाजिक कार्याकडेराहिला. लातूर आणि मराठवाडा जिल्हयात अंधश्रध्दा निर्मुलन मोहिमांमध्ये त्यांनी विशेष लक्ष घातले. वैज्ञानिक जाणीवा निर्माण करण्याच्या प्रकल्पात सात हजारांपेक्षा अधिक शिक्षक त्यांनी प्रशिक्षित केले तर पंचवीस हजारांपेक्षा जास्त मुलांनी एका जिल्हयातून स्वयंअध्ययन परिक्षेला बसवले. राष्ट्रसेवा दल, बाबा आमटे यांचे श्रम संस्कार छावणी शिबिर, जिल्हा साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, भारत जोडो युवा अकादमी, छात्रभारती, समाजभारती, राष्ट्रीय एकात्मता, युवा संघटन, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, युवक बिरादरी, नॅशनल युथ प्रोजेक्ट, आंतरभारती, सर्व्हन्टस् ऑफ पीपल्स सोसायटी, राष्ट्रीय सेवा योजना, बहि:शाल शिक्षण केंद्र, विज्ञान बोधवाहिनी, भानामती प्रबोध धडक मोहिम, विवेक जागर मोहिम, आंतरजातीय-धर्मीय-सत्यशोधकीय विवाह चळवळ, ज्ञानप्रकाश ग्रंथालय अशा सर्व संस्थांमधील विविध जबाबदा-या माधव बावगे न थकता, अविरत पणे सांभाळत असतात. अंधश्रध्दा निर्मुलन कार्याला त्यांचा कायमच अग्रक्रम राहिलेला आहे.