Select Page

मंगला आठलेकर

ग्रंथ पुरस्कार 2012 : वैचारिक

संशोधक, लेखिका, साहित्यचिकित्सक
पत्ता – ऋग्वेद, १०११/२, वर्धमाननगरी, कर्वेनगर, पुणे ४११ ०५२
संपर्क -मो. ९९२२६९१६५०

मराठीत सातत्याने चिकित्सापूर्ण लेखन करणा-या साक्षेपी लेखिका अशी मंगला आठलेकर यांची ओळख आहे. ‘महापुरुषाच्या नजरेतून स्त्री’ या पुस्तकात मंगला आठलेकरांनी धर्मसंस्थापकांच्या आणि थोर विचारवंतांच्या स्त्रियांबाबतच्या विचारांचा परामर्श घेतलेला आहे. हिंदू, बौध्द, ख्रिश्चन, इस्लाम धर्माच्या तत्त्वज्ञानात स्त्रीला दिलेले स्थान व तिच्यावर लादलेले निर्बंध यांचा चिकित्सक विचार त्यांनी मांडला आहे. महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे, महात्मा गांधी, महषी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. र. धों. कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्रीविषयक विचारांचाही परामर्श या ग्रंथात आहे. त्रेचाळीस पृष्ठांच्या समग्र प्रस्तावनेत त्यांनी महत्त्वाच्या विचारवंतांचे स्त्री विषयक विचार मांडले आहेत. आठलेकर यांनी आपल्या ‘हे दु:ख कुण्या जन्माचे’, ‘जगायचीही सक्ती आहे’ या दोन पुस्तकांमधून अनुक्रमे समलैंगिकता, इच्छामरण अशा विषयांवर लेखन केले आहे. रसुलाबाद घाटावरील गुलाबबाई त्रिपाठी ही स्मशानात पौरोहित्य करणारी महिला आठलेकरांच्या ‘गार्गी अजून जिवंत आहे.’ या पुस्तकातून वाचकांसमोर आली. तर ‘बुध्द हसतो आहे’, ‘महापुरुषांच्या नजरेतून स्त्री’ ही दोन पुस्तके धर्म आणि समाजव्यवस्था संदर्भातील आहेत.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2012- मंगला आठलेकर