Select Page

मंगेश नारायणराव काळे

ग्रंथ पुरस्कार 2012 : ललित

कवी
पत्ता – १५ बी, आनंदमयी अपार्टमेंटस्, हॉटेल वरुणराज शेजारी, एरंडवणा, कर्वे रोडे, पुणे ४११ ००४
संपर्क- मो. ९७६६९९४१५४

मंगेश नारायण काळे हे गेली तीन दशकांहून अधिक काळ कविता लिहित आहेत. ‘तृतीय पुरुषाचे आगमन’ हा त्यांचा दीर्घकविता संग्रह आहे. जागतिकीकरणाच्या लाटेमुळे आणि उदारीकरणाच्या प्रभावामुळे सामान्य माणसाची जी संभ्रमित व दिशाहीन अवस्था झाली, त्या अवस्थेचे भिन्नस्वरुपी दर्शन या कवितेत घडते. शंभर पृष्ठांच्या या दीर्घकवितेची मांडणी ही कथन व नाटय यांचे मिश्ररुप आहे. या दीर्घकाव्यात रामायण-महाभारताचे, तुकारामांचे संदर्भ येतात, नारायणराव पेशव्यांच्या काळापासून ते नवभांडवलशाहीच्या आक्रमणापर्यतचे इतिहासातील संदर्भही कवितेत येत राहतात. मंगेश नारायण काळे यांचे ‘मंगेश नारायणराव काळेची कविता’, ‘शक्तिपाताचे सूत्र’, ‘नाळ तुटल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत’ हे कविता-संग्रहही प्रसिद्ध आहेत.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2012- मंगेश नारायणराव काळे