
मनीषा तोकले
कार्यकर्ता पुरस्कार 2015 : असंघटित कष्टकरी
सामाजिक कार्यकर्त्या
पत्ता –
संपर्क – मो. ९३२५०५६८९३
मनीषा तोकले म्हणजे सकारात्मक कार्यकर्तीचा आदर्श. १९९३ च्या भूकंपानंतर पुर्नवसन कार्यात त्यांनी सक्रीयपणे योगदान दिले. पीडित किंवा अडचणीतल्या व्यक्तीला दिवस-रात्र कधीही मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हक्काच्या ताई, अशी त्यांची ओळख आहे. ‘ यशदा’ सारख्या प्रशिक्षण संस्थांमध्ये महिलांच्या हक्कांबाबत आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत अधिका-यांनाही प्रशिक्षण देणा-या मास्टर ट्रेनर म्हणून मनीषा तोकले लोकप्रिय आहेत. एखाद्या गरीब मुलीवर, महिलेवर अत्याचार झाला तर आपला आवाज टिपेला पोहचवत लढाणा-या मनीषातार्इंचे हे रुप अनेकांना अचंबित करते. दलित आणि आदिवासी यांना जमीन कसण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्या कायम प्रयत्नशील असतात. ‘सावित्रीबाई फुले महिला मंडळा’ द्वारे त्या आदिवासींच्या मुलांसाठी काम करतात. ‘जागर’ संस्थेद्वारे शिक्षणाचा प्रकाश आदिवासी मुलांपर्यंत पोहोचावा असा त्यांचा सतत प्रयत्न असतो. त्यांच्या कार्यामागे मानवतावादी दृष्टीकोन आहे. स्वयंसेवक, सहकारी यांना बरोबरीने घेउन जाण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.