Select Page

मारुती चितमपल्ली

महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार – २००३  

मराठी साहित्यात निसर्गाचे अनेकांगी चित्रण झाले आहे. असे चित्रण करणाऱ्या लेखकांत मारुती चितमपल्ली हे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. निसर्गालाही त्याचे असे स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तो चैतन्यमय आहे, म्हणून केवळ भावदर्शनासाठी, पार्श्वभूमीसाठी अथवा प्रतीकात्मक चित्रणासाठी निसर्गाकडे वळण्यापेक्षा त्याच्या वैविध्यपूर्णतेचे, रूपवैभवाचे दर्शन घडवावे, त्याचा शोध घ्यावा या प्रेरणेतून चितमपल्ली यांनी लेखन केले आहे. निसर्गाविषयीचे हे व्यापक भान त्यांच्या निसर्गपर लेखनाला वाङ्मयीन निराळेपण मिळवून देते.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे