Select Page

नागनाथअण्णा नायकवडी

समाजकार्य : जीवनगौरव पुरस्कार 2011

सामाजिक कार्यकर्ते, १९४२च्या क्रांतिलढ्यात सहभाग.

सामाजिक न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे प्रखर क्रांतीकारी अशी नागनाथ अण्णा नायकवडी यांची ख्याती आहे. उत्पादक सेवांचे उद्गाते, नवमहाराष्ट्र निर्मितीसाठी सक्रिय असलेले नागनाथ अण्णा सर्वसामान्यांचे मार्गदर्शक आहेत. १९४२ च्या लढयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या समवेत ते सक्रीय सहभागी होते. सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांविरुद्ध लढा देत अन्यायाविरूद्ध लढण्यास नागनाथ अण्णा कायम तयार असतात. स्वातंत्र्यानंतर ‘हुतात्मा अहिर साखर कारखाना’ स्थापन करुन शेतक-यांना सर्वाधिक देणारा कारखाना असा लौकिक नाथअण्णांनी मिळवून दिला. कर्मवीर पाटील यांच्या आदर्शातून शिराळा पेठा येथे शाळा सुरु केली. म. फुले आणि म. गांधी यांच्या विचारांचा प्रसार केला. सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रातील सर्जक उर्मी असलेले व्यक्तिमत्व म्हणून जनसामान्यांत त्यांना प्रतिष्ठा मिळाली.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2011- नागनाथअण्णा नायकवडी